Saturday, April 19, 2025
HomeSportsसचिन तेंडुलकर भारताविरुद्ध पाकिस्तान क्रिकेट टीम मधून खेळतो तेव्हा......

सचिन तेंडुलकर भारताविरुद्ध पाकिस्तान क्रिकेट टीम मधून खेळतो तेव्हा……

 

उत्तम कामगिरी:- 

सचिन तेंडुलकर ने वयाच्या 16 व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेट मध्ये पदार्पण करित धावांचा मोठा डोंगर उभा केलेला आपण सर्वानी पाहिला आहे. मात्र फारच कमी लोकांना माहीत असेल की सचिन यांना टीम इंडियाच्या विरोधात पाकिस्तानसाठी मैदानात उतरावे लागले होते. ही गोष्ट 1987 सालची आहे. जेव्हा सचिन तेंडुलकर यांचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण देखील झाले नव्हते. दरम्यान, पाकिस्तान टीम पाच कसोटी आणि 6 एक दिवशीय सामने खेळण्यासाठी भारतात आली होती. मालिका सुरु होण्याआधी 20 जानेवारी 1987 साली भारत आणि पाकिस्तान यांच्यात मुंबई येथील ब्रेबॉर्न स्टेडियम मध्ये 40-40 षटकांचा प्रादर्शनीय सामना खेळला गेला होता. या सामान्या दरम्यान जेवणाच्या वेळी अष्टपैलू जावेद मियांदाद आणि फिरकी गोलंदाज  अब्दुल कादिर हे दोन्ही मैदानाच्या बाहेर निघून गेले होते. अशात टीम इंडियाच्या फलंदाजी दरम्यान, सचिन तेंडुलकर हे पाकिस्तानच्या बाजूने सब्स्टिट्यूट खेळाडू म्हणून मैदानात उतरले होते. यावेळी सचिन यांचं वय 13 वर्षे इतकच होते. पाकिस्तानी कर्णधार इमरान खान यांनी त्यांना वाइड लॉन्ग ऑनवर क्षेत्र रक्षणासाठी उभे केले होते. सचिन तेंडुलकर यांनी त्यांची आत्मकथा ‘ प्लेइंग इट माय वे’ यात या प्रसंगाचा उल्लेख केलेला आहे. त्यानंतर काही महिन्यांनी सचिन यांनी पाकिस्तानच्या विरोधात टीम इंडियात पदार्पण करत दमदार खेळ सादर केला होता. पाकिस्तान मधील कराची येथे हा कसोटी सामना खेळाला गेला होता. सामन्यात चार विकेट्स गमावत टीम इंडियाने हा सामना जिंकला होता. त्यानंतर सचिनने कधी वळून पहिले नाही.

विश्वविक्रम ,

    सचिन तेंडुलकर ने आपल्या नावावर  664 आंतराष्ट्रीय सामन्यांमध्ये 34 हजार 357 धावा आहेत. यात 100 शतक आणि 164 अर्धशतकांचा समावेश आहे.  गोलंदाजीत 201 विकेट्स आपल्या नावावर घेतले आहे. क्रिकेट विश्वातील अनेक विश्वविक्रम सचिन तेंडुलकर च्या नावा वर आहेत. क्रिकेट आणि सचिन तेंडुलकर हे समीकरण कोणी विसरू शकलेले नाही. संपूर्ण क्रिकेट विश्वाला अभिमान वाटावा अशी त्यांनी केलेली कामगीरी आहे. 

सचिन आणि  24 तारीख:-

24 तारखेशी सचिन तेंडुलकर यांचे खास कनेक्शन आहे. सचिन तेंडुलकर चा जन्म मुम्बई मध्ये  24 अप्रैल 1973 ला झाला.  सचिन तेंडुलकर व अंजली चा लग्न 24 मे 1995  झाला.  24 फेब्रुवारी 1988 साली सचिन तेंडुलकर ने आपल्या बालमित्र विनोद कांबळी याच्या सोबत हैरीश शिल्ड स्पर्धेच्या सेमी फायनल मध्ये तिसऱ्या विकेट साठी नाबाद 664 धावांची भागीदारी केलेली आहे. त्या वेळी सचिन तेंडुलकर 326 तर विनोद कांबळी 349 धावांसह नाबाद राहिले होते. त्याच्या नंतर 24 नोव्हेंबर 1989 रोजी सचिन तेंडुलकरने 16 व्या वर्षी आपल्या कसोटी सामान्याचे पहिले अर्धशतक झळकविले. 24 फेब्रुवारी 2010 रोजी सचिन तेंडुलकर यांनी दक्षिण आफ्रिकेच्या विरोधात ग्वालियर मधील एक दिवशीय सामन्यात द्विशतक केलेले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular