रत्नागिरी तालुक्यातील मिरकरवाडा, कर्ला,राजीवडा,साखरतर,भाट्ये व नाटे तसेच इतर मुस्लिम बाहुल्य वस्त्यांमध्ये रमजान ईद मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. मोहल्या मोहल्या मध्ये सजावट व रोषणाई करण्यात आली होती तसेच प्रत्येक मशीदी ला फार सुंदर अशी रोषणाई करण्यात आली होती. त्याचे मुख्य कारण म्हणजे मागील दोन वर्षे सन २०२० व २०२१ साली करोना संकट काळात कुठली ही ईद साजरी करता आली नाही म्हणून या वर्षी तरूणांन मध्ये एक आगळा वेगळा उत्साह दिसून आला.
मिरकरवाडा मध्ये तर या वर्षी एक वेगळं वातावरण निर्माण झाले होते,येथील चार ही मशीदींना रोषणाई करण्यात आली होती, त्याच प्रमाणे येथील प्रत्येक मोहल्ल्यात पताके लाऊन सजवत करून रोषणाई करण्यात आली होती. मोहल्या मोहल्ल्यातील हे दृष्य इतके सुंदर व देखणे होते की आजूबाजू चे तसेच लांब चे ही हिंदू मुस्लिम बांधव आपल्या लहान मुलां सहीत मिरकरवाड्यात येऊन हे दृष्य न्याहाळत होते व मोबाईल मध्ये फोटो व शूटिंग घेऊन आपापल्या स्टेटस ला सोडून लोकांना आकर्षित करीत होते.
रमजानचे ३० रोजे पूर्ण झाल्यावर ईद-उल-फितर साजरी करण्यात येते चार, पांच वर्षाच्या मुलां पासून ते ६०, ७० वर्षा च्या वयो वृद्ध बुज़रूग रोजे आनंदाने ठेवतात. दिवसभर उपाशी पोटी राहून तसेच कडाक्याच्या उन्हात काम धंद्यात रहाऊन हे सर्व सहन करून ३० दिवसाचे रोजे उपवास पूर्ण केले जातात.
३० दिवसाचे रोजे (उपवास) पूर्ण झाल्यावर ३ मे मंगळवार रोजी ईद उल फितर ( रमजान ईद) साजरी करण्यात आली. सर्वांनी एकमेकांना ईदच्या शुभेच्छा दिल्या व गला भेटी घेतली. सर्वांनी एकमेकांचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या. नन्हे रोजेदार (छोटे रोजेदार) यांचे ही कौतुक करून त्यांनाही खास शुभेच्छा देण्यात आले. पोलीस खात्या तर्फे प्रत्येक मशीदी जवळ जाऊन मान्यवरांना व छोटे रोज़ेदारांना पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.
रूह पर छा जाए जो ऐसा हसीन जलवा है ईद
रोज़ेदारों के लिए अल्लाह का तोहफ़ा है ईद
(शब्बीर वस्ता)