Saturday, April 19, 2025
Homeराजकीयकेंद्र सरकारच्या महागाई विरोधात तालुका काँग्रेसने भर पावसात केली निदर्शने

केंद्र सरकारच्या महागाई विरोधात तालुका काँग्रेसने भर पावसात केली निदर्शने

 रत्नागिरी (०७ ) प्रतिनिधि   महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या सूचनेनुसार राज्यात सर्व जिल्ह्यांमध्ये काँग्रेस मुख्यालयाच्या ठिकाणी तीव्र निदर्शने करण्याचा इशारा दिला होता त्यानुसार तालुकाध्यक्ष विकास पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस भवन कार्यालय रत्नागिरी येथे महागाई विरोधात निदर्शने करण्यात आली. तदप्रसंगी”कमी करा कमी करा महागाई कमी करा”मोदी सरकार हाय हाय अश्या घोषणांनी काँग्रेस भवन परिसर दणाणून गेला होता.तदनंतर सभा घेऊन महागाई दरवाढीचा,जी एस टी बाबत भाजपच्या केंद्र सरकारने जे सर्वसामान्य जनतेच्या बाबतीत धोरण अवलंबिले आहे त्या केंद्र सरकारच्या धोरणाचा सभेमध्ये निषेधाचा ठराव मांडण्यात आला. सदर ठरावास सूचक म्हणून श्री रमेश शहा तर अनुमोदक मिडिया विभाग जिल्हाध्यक्ष कपिल नागवेकर यांनी केले. तदप्रसंगि तालुकाध्यक्ष विकास पाटील,ओबीसी विभाग प्रदेश उपाध्यक्ष दिपक राऊत, माजीउपनगराध्यक्ष जिल्हा उपाध्यक्ष बाळाशेठ मयेकर,मिडिया विभाग जिल्हाध्यक्ष कपिल नागवेकर, जिल्हा सरचिटणीस अशपाक काद्री, महिला तालुकाध्यक्ष रिझवणा शेख,तालुका सरचिटणीस काका तोडणकर,रवी खेडेकर, जिल्हा चिटणीस शब्बीर भाटकर, विधानसभा क्षेत्रअध्यक्ष सचिन मालवणकर , जुबेर दाव त,स्नेहा मयेकर,कल्पना मोहिते,अंजली तोडणकर इत्यादी कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते

RELATED ARTICLES

Most Popular