मुंबई (२२ ऑक्टोबर):
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील टी-२० विश्वचषक २०२२ सामना उद्या रविवारी, २३ ऑक्टोबर रोजी होणार असून हे दोन संघ मेलबर्नमध्ये एकमेकांशी भिडणार आहेत.
टीम इंडियाचे पूर्ण वेळापत्रक आणि सामन्याच्या वेळा
२३ ऑक्टोबर- भारत विरुद्ध पाकिस्तान: दुपारी १:३० वाजता
२७ ऑक्टोबर- भारत विरुद्ध नेदरलँड: दुपारी १२:३०
३० ऑक्टोबर- भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका: संध्याकाळी ४:३०
२नोव्हेंबर-भारत विरुद्ध बांगलादेश: दुपारी १:३०
६ नोव्हेंबर-भारत विरुद्ध झिंबाब्वे: दुपारी १:३० वाजता
दरम्यान, विश्वचषक २०२२ ची पहिली फेरी म्हणजेच पात्रता फेरी खेळली जात आहे. आठ संघांची दोन गटात विभागणी करण्यात आली आहे. प्रत्येक गटातील अव्वल दोन संघ सुपर १२ मध्ये प्रवेश करतील. भारतीय संघ ज्या गटात आहे, त्यात पाकिस्तान, बांगलादेश आणि दक्षिण आफ्रिकेचे संघ आहेत.