रत्नागिर(दि.२३ आॅक्टोबर): गेली तीन वर्षे सातत्याने सामाजिक कार्य करणारे जकी खान यांनी मसिहा फाउंडेशन रत्नागिरी संस्था स्थापन केली असून त्याला नोंदणीकृत मान्यता मिळाली आहे.
रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात सतत रुग्णांची सेवा करणारे तसेच गोरगरीब जनतेसाठी कायम धावत जाणारे जकी खान यांनी आता आपल्या कार्याला आधीक गती देण्यासाठी या संस्थेची स्थापना केली असल्याचे सांगितले.
या संस्थेचे अध्यक्ष तसव्वर खान, उपाध्यक्ष रशीद काझी, सचिव मंजूर शेख, खजिनदार तौहीद भाटकर यांनी आपल्या वर टाकलेला विश्वास आपण जबाबदारीने सार्थ ठरवू असे अभिवचन संस्थापक जकी खान यांना दिले.
जकी खान यांच्या संस्थेला मान्यता मिळाली हे समजताच त्यांच्या हितचिंतकांनी त्यांचे अभिनंदन केले.यावेळी या संस्थेचे सदस्य पांडुरंग झापडेकर,मुस्तकीम साखरकर,मुजाहिद जमादार,समीर काद्री,रमीज नाईक, बासित दर्वे, राहील सोलकर, युसुफ सोलकर,रवी घोसाळकर,अथर बोरकर,जलाल खान ,बासीद दुर्वे,
तसेच हितचिंतक सलीम जमादार, मकसूद काद्री, तनवीर जमादार,मुनाफ काद्री,शफीक बिजापुरी, नजीर शेख,मुदस्सर भालदार, जुबेर जमादार ,सादीक भालदार,जुनेद खान,सुफीयान शेख,अय्यान शेख,आयमान खान,तहा दलाल,सुबहान शेख आदी उपस्थित होते.