रत्नागिरी (दि.२३आॅक्टोबर):
रत्नागिरी जिल्ह्यातील माध्यमिक उच्च माध्यमिक व शाळांना आता २२ ऑक्टोबर ते ८ नोव्हेंबर अशी दिवाळी ची सुट्टी असणार आहे.असे पत्र आज रत्नागिरी च्या माध्यमिक शिक्षण आधिकारी सौ सुवर्णा सावंत यांनी प्रसिद्ध केले.यापूर्वी जिल्ह्यातील शाळांना २२ नोव्हेंबर ते ६नोव्हेंबर अशी सुट्टी होती.परंतु रत्नागिरी जिल्हा माध्यमिक,उच्च माध्यमिक संघटना समन्वय समितीच्या मागणी नुसार हा अंशतः बदल करण्यात आल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे. या अंशतः झालेल्या बदला मुळे शैक्षणिक वर्षाचा शेवट हा २ मे ऐवजी ३ मे ला होणार असल्याची माहिती रत्नागिरी जिल्हा शिक्षणाधिकारी (माध्यमिक)यांनी दिली आहे