Saturday, April 19, 2025
HomeSportsपाकिस्तानला धूळ चारत टीम इंडिया विजयी

पाकिस्तानला धूळ चारत टीम इंडिया विजयी

मेलबर्न (२३ ऑक्टोबर): भारतीय क्रिकेट रसिकांच्या जीवात धडकी भरवणारी आणि हार्ट अटॅक आणण्यासारखी स्थिती असलेल्या सामन्यात टीम इंडियाने विजयाची दिवाळी साजरी केली. मात्र या सामन्यात विराट कोहली ठरला पुन्हा किंग कोहली ठरला आहे. असंख्य क्रिकेट रसिकांची त्याने मने जिंकली आहेत. त्याने १९ व्या षटकात दोन गगनचुंबी षटकार ठोकत कोहलीने डरकाळी फोडली. शेवटच्या ओव्हर मध्ये १६ धावांची गरज असताना हार्दिक पांड्याची विकेट गमावल्यानंतर कोहलीची उदासीनता वाढली. नो बॉल आणि फ्री हिट चा तितकासा फायदा उठवता आला नसला तरी ३ धावा काढून कोहलीने आपले मनसुबे सिद्ध केले. टीम इंडियाची हार होणार याची चिंता कोहलीच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती. अर्ध शतक झालेले असतानाही त्याने कोणताही उत्साह दाखवला नव्हता. मात्र ५ व्या चेंडूवर दिनेश कार्तिकची विकेट गमावल्यानंतर निराशा व्यक्त केली. शेवटी १ चेंडू शिल्लक असताना आर. अश्र्विनने चौकार ठोकत विजय खेचून आणला आणि कोहलीने विज्योत्सव साजरा केला. त्याला उत्तम साथ मिळाली ती केवळ हार्दिक पंद्याची. पांड्याच्या आक्रमक खेळीच्या जोरावर थरारक सामन्यात भारतानं पाकिस्तानचा पाच विकेट्सनं धुव्वा उडवला.

RELATED ARTICLES

Most Popular