Saturday, April 19, 2025
HomeSportsराष्ट्रप्रेम क्रीडा व शैक्षणिक संस्थेने कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या मान्यताप्राप्त जिल्हास्तरीय वेस्ट...

राष्ट्रप्रेम क्रीडा व शैक्षणिक संस्थेने कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या मान्यताप्राप्त जिल्हास्तरीय वेस्ट झोन ट्रॉफी तेरा वर्षाखालील स्पर्धेचे नियोजन

कोल्हापूर (दि.२८ आॅक्टोबर):
   राष्ट्रप्रेम क्रीडा व शैक्षणिक संस्थेने कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या मान्यताप्राप्त जिल्हास्तरीय वेस्ट झोन ट्रॉफी तेरा वर्षाखालील स्पर्धेचे नियोजन केले आहे. सदरच्या स्पर्धेमध्ये निवड चाचणीनंतर १२० मुलांची निवड करून त्यांची विभागणी सात संघांमध्ये करून, वेस्ट झोन ईगल, वेस्ट झोन वॉरियर, वेस्ट झोन बुल्स, वेस्ट झोन लायन, वेस्ट झोन कॅपिटल, वेस्ट झोन्स टायगर्स अशा सात विविध संघांमध्ये विभागणी करून सदर सात संघांमध्ये लीग माचेस चे आयोजन करण्यात आलेले आहे . सदर स्पर्धेचे उद्घाटन दिनांक २७/१०/२०२२ रोजी रत्नागिरी क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष देसाई सर यांचे हस्ते करण्यात आलेले असून सदर उद्घाटनास डॉ. इमरान पटेल सर पेठ वडगाव, राम कांबळे सर गडिंग्लज,  दिवाकर पाटील सर कोल्हापूर, अमित साळुंखे सर कोल्हापूर, जयराम आ सर गांधीनगर, विवेक दिंडे, संतोष नगर, चौगुले अण्णा, तसेच इरफान पटेल वकील उपस्थित होते. सदर स्पर्धेची सुरुवात वेस्ट झोन टायगर्स आणि वेस्ट झोन ईगल या सामन्याने झाली सदरचा सामना वेस्ट झोन टायगर्सने दोन गडी राखून विजय मिळविला वेस्ट झोन टायगर्स मधील अंश खटवाणी यास सामनावीर घोषित करण्यात आले तर दुसरा सामना वेस्ट झोन बुल्स आणि वेस्ट झोन स्ठयकर्स मध्ये झाला होता त्यामध्ये वेस्ट झोन स्ठयकर्स ने १६९ धावांनी विजय मिळविला असून वेस्ट झोन स्ठयकर्स च्या मुस्कान खटवानी हीस सामनावीर देण्यात आले. सदरची स्पर्धा ही ६/११/२०२२ पर्यंत राष्ट्रप्रेम क्रीडा व शैक्षणिक संस्था पेठ वडगाव च्या राष्ट्रप्रेम निवासी क्रिकेट अकॅडमी मोजे तासगाव यांच्या मैदानावर होणार असून सदर स्पर्धेचे लाईव्ह स्ट्रीमीइंग युट्युब वर दररोज होणार आहे.

RELATED ARTICLES

Most Popular