Saturday, April 19, 2025
HomeNewsजिल्ह्यात ०४ नोव्हेंबर रोजी पालकमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत संपन्न जनता दरबार...

जिल्ह्यात ०४ नोव्हेंबर रोजी पालकमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत संपन्न जनता दरबार होणार


     रत्नागिरी (दि.३१ आॅक्टोबर):  राज्याचे उद्योग मंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी ०४ नोव्हेंबर २०२२ रोजी सकाळी ११ वाजता अल्पबचत सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, रत्नागिरी येथे जनता दरबार आयोजित केला आहे.
     या जनता दरबाराकरिता जिल्ह्यातील सर्व प्रशासकीय यंत्रणाप्रमुख उपस्थित राहणार असून जनता दरबाराकरिता उपस्थित राहणाऱ्या नागरिकांना आधी टोकन क्रमांक दिले जाणार आहेत. जनता दरबारमध्ये प्राप्त झालेल्या अर्जांची नोंद घेवून त्यावर प्रशासनाने केलेल्या कार्यवाहीबाबतचा अहवाल पालकमंत्र्यांना सादर केला जाणार आहे. प्रत्येक महिन्याला अशा प्रकारे या “जनता दरबार”चे आयोजन नियमितपणे केले जाणार आहे.
     तरी नागरिकांनी ०४ नोव्हेंबर २०२२ रोजी सकाळी ११ वाजता अल्पबचत सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, रत्नागिरी येथे होणाऱ्या जनता दरबाराकरिता जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन पालकमंत्री श्री.सामंत यांनी केले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular