Saturday, April 19, 2025
HomeNewsरत्नागिरीत संविधान दिनानिमित्त मूकबधिर विद्यार्थ्यांनी काढली जनजागृती फेरी

रत्नागिरीत संविधान दिनानिमित्त मूकबधिर विद्यार्थ्यांनी काढली जनजागृती फेरी

रत्नागिरी, : संविधान दिनानिमित्त संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन करून कै. के. प. अभ्यंकर मूकबधिर विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी संविधान जागृती फेरी काढून प्रबोधन केले. यामध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेत फलकांद्वारे जनजागृती केली.

आज सकाळी दि न्यू एज्युकेशन सोसायटीच्या गाडीतळ येथील अभ्यंकर मूकबधिर विद्यालयात शालेय प्रार्थना, राष्ट्रगीत झाल्यानंतर संविधान दिनाची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली. व्हिडिओ व पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना संविधान म्हणजे काय याची माहिती समजावून सांगण्यात आली. त्यानंतर उद्देशिकेचे वाचन करून शपथ घेण्यात आली. त्यानंतर शाळेच्या जवळच जनजागृती फेरी काढण्यात आली. त्यावेळी वीर सावरकरांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आले.

फेरीमध्ये विद्यार्थ्यांनी संविधानाने दिला मान स्त्री पुरुष एकसमान, भारत माझी माऊली, संविधान त्याची सावली, नको राजेशाही, नको ठोकशाही, संविधानाने दिली लोकशाही, स्वातंत्र्य, समता, बंधुता, संविधान सांगते एकात्मता, संविधानाची हीच ग्वाही, उच्चनीच कोणी नाही असे फलक विद्यार्थ्यांनी दाखवले. या वेळी ज्येष्ठ शिक्षक रमेश घवाळी, उपासना गोसावी, राजकुमार कसबे, दीप्ती खेडेकर, हनुमंत गायकवाड, साक्षी वासावे आणि पालक यांनीही फेरीत सहभाग घेतला. विद्यालयाच्या व्यवस्थापिका पद्मश्री आठल्ये, मुख्याध्यापक गजानन रजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम यशस्वीपणे आयोजित करण्यात आला.

RELATED ARTICLES

Most Popular