Wednesday, April 9, 2025
HomeNewsउन्हाळी हंगामासाठी कोकण रेल्वे च्या विशेष गाड्या

उन्हाळी हंगामासाठी कोकण रेल्वे च्या विशेष गाड्या

मुंबई:

प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! उन्हाळी हंगामात वाढलेल्या गर्दीचा विचार करून मध्य रेल्वेच्या सहकार्याने खालील विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तपशील पुढीलप्रमाणे आहे:

१) गाडी क्रमांक 01104 / 01103 मडगाव जं. – लोकमान्य टिळक (ट.) – मडगाव जं. साप्ताहिक विशेष:

– गाडी क्रमांक 01104 (मडगाव जं. – लोकमान्य टिळक टर्मिनस):
– ही गाडी प्रत्येक रविवार (06/04/2025 ते 04/05/2025) मडगाव जं. वरून संध्याकाळी 16:30 वाजता सुटेल.
– दुसऱ्या दिवशी 06:25 वाजता लोकमान्य टिळक टर्मिनसला पोहोचेल.

– गाडी क्रमांक 01103 (लोकमान्य टिळक टर्मिनस – मडगाव जं.):
– ही गाडी प्रत्येक सोमवार (07/04/2025 ते 05/05/2025) लोकमान्य टिळक टर्मिनस वरून सकाळी 08:20 वाजता सुटेल.
– त्याच दिवशी 21:40 वाजता मडगाव जं. येथे पोहोचेल.

स्टेशन्स जिथे गाडी थांबेल:
कर्माळी, थिवी, सावंतवाडी रोड, कुडाळ, सिंधुदुर्ग, कणकवली, वैभववाडी रोड, राजापूर रोड, विलवडे, आडवली , त्नागिरी, संगमेश्वर रोड, चिपळूण, खेड, माणगाव, रोहा, पेन, पनवेल आणि ठाणे.

गाडीच्या डब्यांची रचना:
एकूण २० एलएचबी डबे –
– एसी २ टियर: १ डबा
– एसी ३ टियर: ३ डबे
– थ्री टियर इकॉनॉमी: २ डबे
– स्लीपर: ८ डबे
– जनरल: ४ डबे
– जनरेटर कार: १ डबा
– एसएलआर: १ डबा

अधिक माहितीसाठी:
संपूर्ण वेळापत्रक व थांब्यांची माहिती जाणून घेण्यासाठी www.enquiry.indianrail.gov.in या वेबसाइटला भेट द्या किंवा NTES अँप डाउनलोड करा.

तिकीट बुकिंग:
गाडी क्रमांक 01104 चे बुकिंग 02/04/2025 पासून सर्व प्रवासी आरक्षण केंद्रांवर (PRS), इंटरनेट व IRCTC वेबसाइटवर सुरू होईल.

RELATED ARTICLES

Most Popular