Saturday, April 19, 2025
HomeEntertainment'रूप नगर के चिते' या मराठी सिनेमात रत्नागिरीची सना पूजा

‘रूप नगर के चिते’ या मराठी सिनेमात रत्नागिरीची सना पूजा

कालपर्यंत तिला रत्नागिरी शहरातली म्हणून ओळखत होता. पण ती आज एका मराठी चित्रपटामध्ये नायिकेच्या भूमिकेत काम करत असून आजच शुक्रवारी १६ तारखेला तिचा हा सिनेमा रिलीज होत आहे.
  अगदी तो सगळीकडे महाराष्ट्रभर दिसणार आहे .ती आहे सना संदीप प्रभू पूजा आणि संदीप प्रभूची सुकन्या असलेली सना प्रभू  ‘रूप नगर के  चिते’ या मराठी सिनेमा द्वारे आजच शुक्रवारी आपल्या भेटीला येत आहे.
   रत्नागिरी शहराची सुकन्या असलेली  सना  प्रभू हीच शिक्षण दहावीपर्यंत सिक्रेट हार्ट कॉन्व्हेंट मध्ये तर अकरावी बारावी पर्यंतचे शिक्षण  गोगटे जोगळेकर कॉलेजमध्ये झालेले  आहे.
    बारावीनंतर तिने मुंबईतील यूपीजी कॉलेजमध्ये मास मीडिया अँड कम्युनिकेशन या विषयाचा अभ्यास करत आहे.सनाला पहिल्यापासूनच फॅशन शो डान्सिंग याची आवड होती.2018 मध्ये झालेल्या मिस पुणे या सौन्दर्य स्पर्धेत ही ती विजयी झाली होतो.
   हे कलागुण तिला तिच्या आई-वडिलांकडूनच प्राप्त झालेले आहे. संदीप व पूजा प्रभू दोघेही कलाकार असून त्यामुळे त्यांचे गुण सना मध्ये आले तर नवल नाही.
   ‘रुप नगर के  चिते’ या मराठी चित्रपटात चार चौघांच्या ग्लॅमरर्सचा तडका असून हा आगळावेगळा चित्रपट मैत्री या भावनेवर आधारित असून मैत्री या शब्दाला वेगळ्या उंचीवर नेणारा असा आहे .
   आज शुक्रवारी १६ सप्टेंबरला संपूर्ण महाराष्ट्रभर हा सिनेमा प्रदर्शित होणार असून विहान सूर्यवंशी यांनी हा  सिनेमा दिग्दर्शित केलेला आहे.
   एस  इंटरटेनमेंट बॅनर खाली मनन शहा यांनी  रुप नगर के चिते या मराठी चित्रपटाची निर्मिती केली आहे.
   या चित्रपटात करण परब आणि कुणाल शुक्ल हे दोन नवोदित कलाकार मुख्य भूमिकेत दिसणार असून या  दोघांच्या मैत्रीला मुग्धा चाफेकर ,हेमल इंगळे ,आयुष्यी भावे  आणि सना प्रभू यांचा ग्लॅमर लूक  लाभला आहे.
   त्यामुळे रत्नागिरीकरासाठी ही  नक्कीच अभिमानाची गोष्ट असून आज प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाला सगळ्यांनीच भरभरून दाद द्यावी.

RELATED ARTICLES

Most Popular