वडिलांचा समाजसेवेचा वारसा घेऊन पक्षाचे काम करणार : सूरज शेट्ये

Shabbir Vasta
1 Min Read

राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाच्या नवनियुक्त युवक जिल्हाध्यक्षांचा रत्नागिरीत जंगी सत्कार!


रत्नागिरी (प्रतिनिधी) : “माझे वडील सुहास वामन तथा कुमार शेट्ये यांनी अनेक वर्षे समाजसेवेचा वसा घेऊन प्रामाणिकपणे काम केले. तोच वारसा पुढे अखंड चालवत मी पक्ष आणि समाजासाठी पूर्ण ताकदीने काम करेन,” अशी ग्वाही राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे नवनिविर्चित युवक जिल्हाध्यक्ष सूरज शेट्ये यांनी दिली.
      युवक जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर सूरज शेट्ये हे पहिल्यांदाच जिल्हा दौऱ्यावर आले असता, रत्नागिरी तालुका व शहर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे त्यांचा भव्य सत्कार करण्यात आला. या सत्कार सोहळ्याला उत्तर देताना ते बोलत होते.
      पुढे बोलताना सूरज शेट्ये म्हणाले की, “पक्ष संघटनेने माझ्यावर जो विश्वास दाखवला आहे, त्या विश्वासाला मी कधीही तडा जाऊ देणार नाही. प्रामाणिकपणे पक्षाचे काम करून भविष्यात पक्षाला जिल्ह्यात चांगले दिवस आणण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करेन. तसेच वडिलांच्या स्वच्छ प्रतिमेला कधीच डाग लागू देणार नाही.”

      या सत्कार समारंभाप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये प्रामुख्याने सनिफखान गवाणकर (रत्नागिरी तालुकाध्यक्ष), नीलेश भोसले (शहराध्यक्ष),याकुब खान (सेवादल जिल्हाध्यक्ष),महेंद्र कदम (सामाजिक न्याय जिल्हाध्यक्ष),दीपिका कोतवडेकर (महिला जिल्हाध्यक्ष),सानिका पाटेकर (युवती जिल्हाध्यक्ष),इम्तियाज नाखवा,नसीमा डोंगरकर,
अमित भाटकर यांच्यासह पक्षाचे इतर आजी-माजी पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनीच सूरज शेट्ये यांना पुढील वाटचालीस आणि पक्षविस्तारासाठी शुभेच्छा दिल्या.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *