रत्नागिरीत ३० जूनपासून विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम (SIR) सुरू; मतदार नोंदणीसाठी कागदपत्रे तयार ठेवण्याचे आवाहन

Shabbir Vasta
2 Min Read

रत्नागिरी:
भारत निवडणूक आयोगाच्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत (Special Summary Revision – SIR) ३० जूनपासून रत्नागिरीसह संपूर्ण जिल्ह्यात मतदार नोंदणीची विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेद्वारे स्थानिक पातळीवर मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) घरोघरी जाऊन आवश्यक फॉर्मचे वाटप करणार आहेत.
     लोकशाहीच्या प्रक्रियेत प्रत्येक मतदाराचा सहभाग असावा, यासाठी निवडणूक आयोगाने ही मोहीम राबवली आहे. ज्या मतदारांचे मॅपिंग झालेले आहे, त्यांना तसेच ज्यांचे मॅपिंग अद्याप झालेले नाही, अशा सर्वच नागरिकांना हे फॉर्म भरणे अनिवार्य आहे. त्यामुळे आपले नाव मतदार यादीत समाविष्ट करण्यासाठी किंवा अद्ययावत करण्यासाठी नागरिकांनी सतर्क राहणे गरजेचे आहे.

मतदारांनी फॉर्म भरताना खालील कागदपत्रे तयार ठेवावीत:

ओळख आणि पत्त्याचा पुरावा:  [रेडॅक्टेड – सरकारी ओळखपत्र] आणि मतदार ओळखपत्र (Voter ID Card).
संपर्क:  स्वतःचा चालू मोबाईल क्रमांक.
फोटो:  कलर पासपोर्ट आकाराचे दोन फोटो (फॉर्मवर दोन फोटो चिकटवणे आवश्यक आहे).
नागरिकांनी फोटो उपलब्ध नसल्यास आजच ते काढून तयार ठेवावेत, जेणेकरून BLO आपल्या घरी आल्यावर फॉर्म भरताना कोणतीही अडचण किंवा विलंब होणार नाही.
‘स्टार न्यूज कोकण’ च्या माध्यमातून सर्व रत्नागिरीकरांना आवाहन करण्यात येत आहे की, मतदार नोंदणीच्या या महत्त्वाच्या मोहिमेत BLO यांना पूर्ण सहकार्य करावे. तसेच आपल्या कुटुंबातील सदस्यांसह शेजारील नागरिकांनाही या मोहिमेबाबत माहिती देऊन त्यांना मतदार नोंदणीसाठी प्रोत्साहित करावे. आपले नाव मतदार यादीत आहे की नाही, याची खातरजमा करून घेऊन आवश्यक असल्यास हे फॉर्म भरून आपली लोकशाहीतील जबाबदारी पार पाडावी.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *