रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर मिरकरवाडा चकाचक! नगरसेवक सुहेल साखरकर आणि नगरसेविका आफरीन होडेकर मैदानात

Shabbir Vasta
1 Min Read

रत्नागिरी (प्रतिनिधी):
पवित्र रमजान ईद अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्याने मिरकरवाडा परिसरातील स्वच्छतेच्या कामांना वेग आला आहे. आपल्या प्रभागातील नागरिकांना सण उत्साहात आणि स्वच्छ वातावरणात साजरा करता यावा, यासाठी स्थानिक नगरसेवक सुहेल साखरकर आणि नगरसेविका आफरीन होडेकर हे स्वतः मैदानात उतरून कामाचा आढावा घेत आहेत.

कब्रस्तानची साफसफाई आणि धूळवड:
नगरसेवक सुहेल साखरकर यांच्या मार्गदर्शनाखाली सध्या परिसरातील कब्रस्तानची विशेष साफसफाई मोहीम हाती घेण्यात आली आहे. केवळ कचरा वेचणेच नव्हे, तर संपूर्ण परिसराची धूळवड आणि स्वच्छता करून परिसर नीटनेटका करण्यावर त्यांचा भर आहे.

प्रत्येक मोहल्ल्यात प्रत्यक्ष पाहणी:
दुसरीकडे, नगरसेविका आफरीन होडेकर या मिरकरवाड्यातील प्रत्येक मोहल्ल्यात स्वतः जाऊन स्वच्छतेच्या कामाची देखरेख करत आहेत. कामगारांकडून योग्य पद्धतीने काम करून घेण्यासोबतच, नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन त्या तातडीने सोडवण्याला नगरसेवक सुहेल साखरकर आणि नगरसेविका आफरीन होडेकर त्यांनी प्राधान्य दिले आहे.

मिरकरवाड्याचा कायापालट:
रमजान ईदपूर्वी संपूर्ण मिरकरवाडा गाव ‘चकाचक’ करण्याचा निर्धार या दोन्ही लोकप्रतिनिधींनी केला आहे. त्यांच्या या सक्रिय पुढाकारामुळे मिरकरवाडा परिसरातून समाधान व्यक्त होत असून, ईदच्या स्वागतासाठी गाव सज्ज झाले आहे.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *