मुंबई:
ग्रामीण आणि दुर्गम भागातील आदिवासी तरुणींनी आता केवळ स्वप्नेच पाहायची नाहीत, तर ती सत्यात उतरवण्यासाठी एक मोठी संधी उपलब्ध झाली आहे. ‘नामदेव ढसाळ फाउंडेशन’ आणि ‘एअरनोव्हा एव्हिएशन ॲकॅडमी’ (Airnova Aviation Academy) यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यातील अनुसूचित जमाती (ST) प्रवर्गातील तरुणींसाठी विमान वाहतूक क्षेत्रात करिअर करण्याची सुवर्णसंधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.
या उपक्रमांतर्गत व्यावसायिक पायलट (CPL), कॅबिन क्रू (Cabin Crew) आणि ग्राउंड स्टाफ (Ground Staff) यांसारख्या उच्च दर्जाच्या प्रशिक्षणाची दारे आदिवासी मुलींसाठी उघडली आहेत. विशेष म्हणजे, या प्रशिक्षणाचे संपूर्ण शुल्क सरकारतर्फे भरले जाणार असून, प्रशिक्षणार्थींना निवास, भोजन आणि गणवेशाची सुविधा देखील मोफत पुरवली जाणार आहे.
प्रशिक्षणाची ठळक वैशिष्ट्ये:
व्यावसायिक पायलट (CPL): जागतिक दर्जाचे प्रशिक्षक आणि सिम्युलेटरद्वारे प्रशिक्षण.
कॅबिन क्रू: व्यक्तिमत्व विकास, इन-फ्लाइट सर्व्हिस आणि इंग्रजी संभाषण कौशल्य.
ग्राउंड स्टाफ: एअरपोर्ट ऑपरेशन्स आणि कस्टमर हँडलिंगचे सविस्तर प्रशिक्षण.
शंभर टक्के प्लेसमेंट साहाय्य: देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय एअरलाईन्समध्ये नोकरीची संधी.
प्रवेशासाठी पात्रता:
या प्रशिक्षणासाठी अर्ज करणाऱ्या तरुणी केवळ अनुसूचित जमाती (ST) मधील असाव्यात. त्यांचे शिक्षण किमान बारावी (10+2) उत्तीर्ण असावे आणि वय १८ ते २७ वर्षांच्या दरम्यान असावे. याशिवाय शारीरिक उंची (किमान ५ फूट २ इंच) आणि वैद्यकीयदृष्ट्या फिट असणे आवश्यक आहे.
निवड प्रक्रिया कशी असेल?
प्रवेशासाठी जिल्हास्तरीय कॅम्प आयोजित केले जाणार आहेत. यामध्ये शारीरिक आणि शैक्षणिक छाननी, मुलाखत व समुपदेशन यांद्वारे अंतिम निवड केली जाईल.
या उपक्रमामुळे महाराष्ट्रातील आदिवासी भागातील हजारो तरुणींना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार असून, त्या आत्मनिर्भर होण्यास मोठी मदत होणार आहे. या प्रशिक्षणासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून, इच्छुकांनी लवकरात लवकर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क:
एअरनोव्हा एव्हिएशन ॲकॅडमी, नवी मुंबई.
फोन: +91 7208604748 / 022 46650768
वेबसाइट: www.airnovaacademy.com

