‘नारीशक्ती वंदन’ अभियानामुळे शिरगाव (मयेकरवाडी) येथे महिलांमध्ये उत्साहाचे वातावरण; महिला सक्षमीकरणावर दिला भर

Shabbir Vasta
1 Min Read

रत्नागिरी:

एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प, रत्नागिरी-१ अंतर्गत बिट कोतवडे-१ च्या शिरगाव, मयेकरवाडी अंगणवाडीत नुकतेच ‘नारीवंदन अभियान’ उत्साहात पार पडले. या कार्यक्रमात महिलांच्या आरोग्य आणि सक्षमीकरणावर विशेष मार्गदर्शन करण्यात आले.
     कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषद सदस्या मा. श्रद्धा दीपक मोरे उपस्थित होत्या. त्यांनी आपल्या मार्गदर्शनात महिला सक्षमीकरणाचे महत्त्व अधोरेखित करत महिलांना त्यांच्या हक्कांची जाणीव करून दिली. समाजात महिलांचे स्थान उंचावण्यासाठी शिक्षणासोबतच आर्थिक आणि सामाजिक स्वावलंबन किती गरजेचे आहे, यावर त्यांनी सविस्तर चर्चा केली.
     यावेळी अंगणवाडी सेविका सौ. ममता मनोहर गावडे यांनी ‘नारीशक्ती वंदन’ अभियानाचा उद्देश स्पष्ट केला. महिलांसाठी शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती देत, आरोग्याबाबत जागरूक राहण्याचे आवाहन त्यांनी केले. कार्यक्रमादरम्यान आशासेविका सौ. दीपा रत्नदीप कांबळे यांनी महिलांच्या आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या गर्भाशयाच्या तपासणीविषयी आणि त्यासंबंधित आजारांची लक्षणे व प्रतिबंधात्मक उपायांची सखोल माहिती दिली.
      या अभियानाला स्थानिक महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल सर्वांचे आभार अंगणवाडी सेविका सौ. ममता गावडे यांनी मानले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अंगणवाडी मदतनीस सान्वी सुमित कांबळे यांचे विशेष सहकार्य लाभले. या उपक्रमामुळे शिरगाव येथील महिलांमध्ये आपल्या आरोग्याबाबत आणि हक्काबाबत नवी जागृती निर्माण झाली आहे.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *