जेईई-मेन २०२६ निकाल: चाटे क्लासेसच्या २१३ विद्यार्थ्यांची ‘जेईई ॲडव्हान्स्ड’साठी बाजी

Shabbir Vasta
1 Min Read

कोल्हापूर (प्रतिनिधी):
जेईई-मेन २०२६ या परीक्षेचा अंतिम निकाल नुकताच जाहीर झाला असून, यात चाटे क्लासेस, चाटे आयआयटी-नीट सेंटर आणि ज्युनिअर कॉलेजच्या तब्बल २१३ विद्यार्थ्यांनी जेईई ॲडव्हान्स्ड परीक्षेसाठी पात्र ठरून नेत्रदीपक यश संपादन केले आहे.
या यशाबद्दल बोलताना चाटे शिक्षण समूहाचे संचालक प्रा. डॉ. भारत खराते यांनी सांगितले की, “हे यश म्हणजे चाटे पॅटर्ननुसार मेहनत घेणारे विद्यार्थी आणि त्यांना योग्य मार्गदर्शन करणारे आमचे शिक्षक यांचे एकत्रित फळ आहे.”

विशेष यशस्वी विद्यार्थी (एनटीए स्कोअर):
या परीक्षेत खालील विद्यार्थ्यांनी विशेष गुण मिळवून बाजी मारली आहे:
ओम फराकडे: ९९.६४%
सक्षम भालेकर: ९९.५१%
श्रेयस फराकडे: ९९.४६%
तनीष उनावणे: ९८.१७%
रोशन राठोड: ९७.०५%
श्रीराम बोधे: ९६.२४%
आसिफ इनामदार: ९५.८२%
किरण बोरकर: ९५.३५%
विनीत गादीया: ९५.३४%
प्रशंसा पवार:९५.३३%
क्षितिज मर्दाने: ९५.२४%
तेजस उफड: ९५.२२%
हर्षदा बांबरस: ९५.००%
या यशस्वी विद्यार्थ्यांचे चाटे शिक्षण समूहाचे अध्यक्ष प्रा. मच्छिंद्र चाटे आणि संचालक प्रा. गोपीचंद चाटे यांनी अभिनंदन केले असून, त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *