रत्नागिरी : नवनिर्माण शिक्षण संस्थेच्या रत्नागिरी येथील मुंबई विद्यापीठाच्या एस. पी. हेगशेट्ये महाविद्यालचा बँकिंग अँड इन्शुरन्स (BBI) अभ्यासक्रमाच्या एप्रिल २०२६ मध्ये झालेल्या परीक्षेचा निकाल 100% लागला असून विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे.
विद्यार्थ्यांच्या या यशामुळे महाविद्यालय परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. सर्वत्र विद्यार्थ्यांचे कौतुक आणि शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
मुंबई विद्यापीठाच्या सत्र सहाच्या परीक्षेत कु. मुजावर इल्का रियाझ शेहनाझ हिने सीजीपीए 9.70 गुण मिळवत प्रथम येण्याचा मान मिळविला, कु. पाटणकर अरफा नियाज सलीना हिने सीजीपीए ९.४५ गुणांसह द्वितीय, तर कु. शिवलकर रिद्धी राकेश हिने सीजीपीए ९.२० गुणांसह तृतीय येण्याचा मिळविला.
विद्यार्थ्यांच्या उत्कृष्ट यशाबद्दल संस्थेचे चेअरमन अभिजित हेगशेट्ये, संचालिका सीमा हेगशेट्ये तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय गवाळे, विभागप्रमुख प्रा. निशिता पिलणकर, सर्व प्राध्यापक तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
एस. पी. हेगशेट्ये महाविद्यालयाचा “बँकिंग अँड इन्शुरन्सचा” निकाल 100%
Leave a Comment
