रत्नागिरी:
रत्नागिरी शहरातील नगर परिषद शाळा क्रमांक १५, दामले विद्यालयाने शिष्यवृत्ती परीक्षेत आपल्या यशाची परंपरा यंदाही दिमाखात कायम राखली आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने घेण्यात आलेल्या इयत्ता ५ वी व इयत्ता ८ वी शिष्यवृत्ती परीक्षेत दामले विद्यालयाच्या तब्बल २१ विद्यार्थ्यांनी शहरी सर्वसाधारण गुणवत्ता यादीत स्थान मिळवून शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे.
स्पृहा जोशीची जिल्ह्याभरात मोहोर
या परीक्षेत इयत्ता ५ वीची विद्यार्थिनी स्पृहा चंद्रशेखर जोशी हिने नेत्रदीपक यश संपादन केले आहे. तिने जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला असून, राज्यात १५ वी येण्याचा मान मिळवला आहे. या घवघवीत यशामुळे शहरात आणि विद्यालयात उत्साहाचे वातावरण आहे. शाळेच्या वतीने यशस्वी विद्यार्थ्यांची रथातून मिरवणूक काढून त्यांचे जंगी अभिनंदन करण्यात आले.
गुणवत्ता यादीतील यशस्वी विद्यार्थी:
इयत्ता ५ वी (पूर्व उच्च प्राथमिक):
स्पृहा चंद्रशेखर जोशी (जिल्ह्यात प्रथम, राज्यात १५वी), हर्षवर्धन सचिन पाटील (जिल्ह्यात १२वा), आयुष अनिरुद्ध जोशी (जिल्ह्यात २१ वा), उमेर वसीम सय्यद (जिल्ह्यात ३५वा), दाक्षी उमेश शिंदे (जिल्ह्यात ३६ वी), ईश्वरी रमाकांत डिंगणे (जिल्ह्यात ६१ वी), साधना संजय लिंगायत (जिल्ह्यात ६२वी), स्वाती गंभिरानंद मदने (जिल्ह्यात ६५वी), आराध्या दिपक रानडे (जिल्ह्यात ९८वी), स्मित संदीप मांडवकर (जिल्ह्यात ११४वा), प्रिती राजेश जाधव (जिल्ह्यात ११७ वी).
मार्गदर्शक शिक्षक: सौ. श्रद्धा गांगण, श्री. योगेश कदम, श्री. मुकेश पाटील, श्री. इरफान शेख.
इयत्ता ८ वी (पूर्व माध्यमिक):
ओम हरिश्चंद्र वरेकर (जिल्ह्यात ९वा), श्रेया सचिन खंदारे (जिल्ह्यात २९ वी), सई मनोज जोशी (जिल्ह्यात ३५वी), सावनी आल्हाद आठलेकर (जिल्ह्यात ४२ वी), आराध्य देवेंद्र डेंगळे (जिल्ह्यात ४३वा), ईशा विशाल चव्हाण (जिल्ह्यात ७५वी), राज रमेश कोकरे (जिल्ह्यात ८४ वा), सिद्धी संदीप स्वामी (जिल्ह्यात ९२वी), आसावरी सौरभ अवताडे (जिल्ह्यात ९३ वी), स्वराज संजय लिंगायत (जिल्ह्यात ९४ वा).
मार्गदर्शक शिक्षक: सौ. मंजिरी लिमये, सौ. सिद्धी विचारे, श्री. रवींद्र शिंदे, श्री. अक्षय जोगळेकर, श्रीम. ज्योती डंबाळे.
लोकप्रतिनिधी व प्रशासनाकडून कौतुक
विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल नगराध्यक्ष सौ. शिल्पाताई सुर्वे, प्रशासन अधिकारी प्रा. सुधाकर मुरकुटे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मिलिंद संसारे आणि मुख्याध्यापक भगवान मोटे यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे, पालकांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे विशेष अभिनंदन केले आहे.
