रत्नागिरीत विद्यार्थ्यांसाठी जनजागृती कार्यक्रम; ‘मिशन रायझिंग फ्लॉवर्स’ अंतर्गत विविध विषयांवर मार्गदर्शन
रत्नागिरी:
येथील सेक्रेड हार्ट कॉन्व्हेंट हायस्कूलमध्ये (शहर) रत्नागिरी शहर पोलीस ठाण्याच्या वतीने “मिशन रायझिंग फ्लॉवर्स” अंतर्गत विद्यार्थ्यांसाठी सुरक्षितता, सजकता, व स्वसंरक्षण आणि सायबर अवेअरनेस असा जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या वेळी शहर पोलीस निरीक्षक विवेक पाटील, पोलीस उपनिरीक्षक सागर शिंदे, तसेच पोलीस हेड कॉन्स्टेबल राकेश बागुळ, वैभव नार्वेकर, संतोष सावंत व महिला पोलीस हेडकॉन्स्टेबल सौ. पुनम ढवळ आदी पोलीस अधिकारी उपस्थित होते.
या कार्यक्रमामध्ये पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनच्या साह्याने चित्रफीत दाखवून अमली पदार्थांचे दुष्परिणाम, मानसिक व शारीरिक हानी, ऑनलाइन फसवणूक, वाहतुकीचे नियम व सुरक्षा, पोस्को कायद्याबद्दल जनजागृती आदी विषयांसंबंधी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांमध्ये विविध प्रकारे स्वसंरक्षण जागृती आणि जाणीव यासंदर्भात माहिती दिली व विविध हेल्पलाईन नंबर यांची माहिती ही दिली.


