रत्नागिरी:
रत्नागिरी जिल्हा परिषदेतील राजकीय हालचालींना अखेर पूर्णविराम मिळाला असून, महत्त्वाच्या सभापती पदांसाठी नवीन नावांची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. शिवसेना मुख्यनेते आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या आदेशानुसार ही निवड प्रक्रिया पार पडली असून, आगामी सव्वा वर्षासाठी या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.
शिवसेना उपनेते डॉ. उदय सामंत यांच्या स्वाक्षरीने हे अधिकृत पत्र प्रसिद्ध करण्यात आले आहे. यामध्ये बांधकाम, आरोग्य, महिला व बालकल्याण अशा महत्त्वपूर्ण खात्यांची जबाबदारी नव्या चेहऱ्यांवर सोपवण्यात आली आहे.
कोणाला मिळाली कोणती जबाबदारी?
जिल्हा परिषदेच्या विविध समित्यांच्या रिक्त पदांवर खालील सदस्यांची वर्णी लागली आहे:
१. श्री. विलास चाळके – उपाध्यक्ष (बांधकाम व आरोग्य विभाग)
२. सौ. मयुरी मिलींद शिर्के – सभापती (महिला व बालकल्याण विभाग)
३. श्री. महेश राघू नाटेकर – सभापती (कृषी व पशु संवर्धन विभाग)
४. ॲड. सुयोग नंदकुमार कांबळे – सभापती (समाजकल्याण विभाग)
५. श्री. नंदकुमार नारायण मुरकर – सभापती (अर्थ व शिक्षण विभाग)
सव्वा वर्षाचा कार्यकाळ
या सर्व नियुक्त्या सव्वा वर्षाच्या कालावधीसाठी असतील, असे या पत्रात स्पष्ट करण्यात आले आहे. या नव्या निवडीमुळे जिल्हा परिषदेच्या प्रशासकीय कामाला आता अधिक गती मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आपल्या आवडत्या नेत्यांची वर्णी लागल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे.
रत्नागिरी जिल्हा परिषदेत सत्तेची नवी समीकरणे! सभापती पदांच्या नावांची अधिकृत घोषणा; ‘या’ नेत्यांना मिळाली संधी
Leave a Comment
