सामाजिक कार्यकर्ते संजय हळदणकर यांची संकटसमयी तत्पर मदत; कुटुंबाला १० हजारांची आर्थिक मदत
रत्नागिरी : रत्नागिरी शहरातील विश्वनगर परिसरात नगरपालिकेच्या कर्मचारी वसाहतीसमोर राहणाऱ्या सुनील सुवरे यांच्या घराला गुरुवारी सायंकाळी देवधरतळीत दिव्यामुळे अचानक आग लागल्याची घटना घडली. आगीने काही क्षणांतच रौद्ररूप धारण केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. या आगीत सुवरे कुटुंबाच्या घरातील साहित्याचे मोठे नुकसान झाले असून, सुमारे पावणेदोन लाख रुपयांचे आर्थिक नुकसान झाल्याची माहिती आहे.
आगीची माहिती मिळताच रत्नागिरी नगरपालिकेचा अग्निशमन बंब घटनास्थळी तातडीने दाखल झाला. त्याचवेळी स्थानिक तरुण प्रवीण वाघेला, घोसाळे, सूरज पवार, संकेत कांबळे, नरेश मोहिते आणि स्वरूप जाधव यांनीही प्रसंगावधान राखत अग्निशमन दलाच्या जवानांना मदत केली. तरुणांच्या शर्थीच्या प्रयत्नांमुळे आग आटोक्यात आणण्यात यश आले आणि मोठा अनर्थ टळला.
संजय हळदणकर यांची माणुसकीची धाव
या संकटसमयी सामाजिक कार्यकर्ते संजय हळदणकर यांनी दाखवलेली तत्परता आणि माणुसकी विशेष कौतुकास्पद ठरली. आगीची घटना समजताच त्यांनी विलंब न करता घटनास्थळी धाव घेत सुवरे कुटुंबाची विचारपूस केली. संकटाच्या काळात कुटुंबाला केवळ धीर न देता त्यांनी तातडीने १० हजार रुपयांची आर्थिक मदत करून माणुसकीचा आदर्श निर्माण केला.
आपत्तीच्या प्रसंगी अनेक जण केवळ सहानुभूती व्यक्त करतात; मात्र बारक्या हळदणकर यांनी प्रत्यक्ष मदतीचा हात पुढे करून संकटग्रस्त कुटुंबाच्या पाठीशी उभे राहण्याचे काम केले, हे विशेष उल्लेखनीय आहे. त्यांच्या या संवेदनशील भूमिकेचे परिसरातून कौतुक होत आहे.
संकटाच्या काळात गरजूंच्या मदतीला धावून जाणे, आर्थिक आधार देणे आणि सामाजिक बांधिलकी जपणे, हीच खरी माणुसकी असल्याचे संजय हळदणकर यांच्या कृतीतून दिसून आले. त्यांच्या या तत्पर मदतीमुळे सुवरे कुटुंबाला मोठा मानसिक आधार मिळाला असून, त्यांच्या सामाजिक कार्याचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.
घराला भीषण आग; बारक्या हळदणकरांची तत्पर मदत ठरली आधार
Leave a Comment
