राजेभाऊ लिमये यांचे वृद्धापकाळाने निधन

Shabbir Vasta
1 Min Read

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष, रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी संचालक तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार यांचे निकटवर्तीय राजेभाऊ लिमये यांचे आज वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. ते गेल्या काही महिन्यांपासून आजारी होते.

राजेभाऊ लिमये यांनी आपल्या प्रदीर्घ सामाजिक व राजकीय कारकिर्दीत विविध महत्त्वाच्या पदांवर काम केले. त्यांनी नारळ बोर्डाचे अध्यक्ष तसेच यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे कोकण विभागीय अध्यक्ष म्हणूनही जबाबदारी सांभाळली होती.

रत्नागिरी जिल्ह्याच्या सामाजिक, राजकीय आणि सहकार क्षेत्रात त्यांनी उल्लेखनीय योगदान दिले. त्यांच्या निधनाने जिल्ह्यातील राजकीय व सामाजिक क्षेत्रातून हळहळ व्यक्त होत आहे.

त्यांची अंत्ययात्रा आज सायंकाळी ७ वाजता टिळक आळी येथील त्यांच्या राहत्या घरापासून निघणार आहे.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *