रत्नागिरी जिल्ह्याला भूकंपाचा दुसरा धक्का; चिपळूण तालुक्यातील येगाव येथे केंद्रबिंदू

Shabbir Vasta
1 Min Read

रत्नागिरी:
गेल्या दीड महिन्यांच्या कालावधीत रत्नागिरी जिल्ह्याला भूकंपाचा दुसरा धक्का बसला आहे. आज, दिनांक २९ एप्रिल रोजी दुपारी २ वाजून १७ मिनिटांनी २.७ रिश्टर स्केल तीव्रतेचा सौम्य भूकंपाचा धक्का जाणवला. या भूकंपाचा केंद्रबिंदू चिपळूण तालुक्यातील येगाव परिसरात असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
यापूर्वी १२ मार्च २०२६ रोजी रत्नागिरीला भूकंपाचा धक्का बसला होता, ज्याचे केंद्र रत्नागिरी तालुक्यातील ‘हर्चे’ येथे होते. वारंवार जाणवणाऱ्या या सौम्य धक्क्यांमुळे नागरिक सतर्क झाले आहेत. सुदैवाने, या दोन्ही घटनांमध्ये कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *