रत्नागिरी:
जिल्ह्यात पावसाने ओढ दिल्याने उन्हाचा कडाका आणि उकाडा मोठ्या प्रमाणात वाढला आहे. याचा लहान मुलांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ नये, यासाठी रत्नागिरी जिल्हा परिषदेने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) वैदेही रानडे यांनी शनिवारी (२० जून २०२६) या संदर्भात अधिकृत परिपत्रक प्रसिद्ध केले आहे. या आदेशानुसार:
जिल्हा परिषदेच्या सर्व शाळा सोमवार, २२ जून २०२६ पासून सकाळी ०७:०० ते ११:३० या वेळेत भरवण्यात येणार आहेत..हा निर्णय २२ जून ते ३० जून २०२६ या कालावधीसाठी लागू असेल. जिल्ह्यात मान्सूनचा पाऊस पुन्हा सक्रिय झाल्यानंतर शाळा पुन्हा नेहमीच्या नियमित वेळेनुसार पूर्ववत सुरू केल्या जातील, असेही प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
रत्नागिरीतील जिल्हा परिषदेच्या शाळांच्या वेळेत बदल; वाढत्या उकाड्यामुळे प्रशासनाचा निर्णय
Leave a Comment
