मोठी बातमी! राज्यातील 12 वी बोर्ड परीक्षेचा निकाल शनिवारी जाहीर होणार; विद्यार्थ्यांना ऑनलाईन पाहता येणार

Shabbir Vasta
1 Min Read

मुंबई :

राज्यातील 12 वी बोर्ड परीक्षेचा  निकाल शनिवार 2 मे रोजी सकाळी 11 वाजता महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक बोर्डाकडून जाहीर करण्यात येणार आहे. त्यानंतर, विद्यार्थ्यांना दुपारी 1 वाजता ऑनलाईन वेबसाटईवर पाहाता येणार आहे. काही दिवसांपूर्वी सीबीएसई बोर्डाचा निकाल जाहीर झाला होता. त्यानंतर, राज्यातील 12 बोर्ड परिक्षेच्या निकालाच्या तारखेकडे सर्वांचे लक्ष लागले होते.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी–मार्च 2026 मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.12 वी) परीक्षेचा निकाल शनिवार, दिनांक 2 मे 2026 रोजी दुपारी 1 वाजता ऑनलाइन पद्धतीने जाहीर करण्यात येणार आहे. सदर निकाल अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येईल. विद्यार्थ्यांनी आपला आसन क्रमांक व इतर आवश्यक तपशीलांच्या आधारे निकाल पाहता येईल. यासंदर्भात अधिक माहिती देण्यासाठी शनिवार, 2 मे रोजी सकाळी 11 वाजता राज्य मंडळाच्या कार्यालयात पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली आहे.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *