नगरसेविका आफरीन उबैद होडेकर यांच्या पुढाकाराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
रत्नागिरी : मिरकरवाडा परिसरातील नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेत नगरसेविका आफरीन उबैद होरेकर यांच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आलेल्या मोफत नेत्र तपासणी शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. नागरिकांची मोठी मागणी आणि शिबिराला मिळालेला उत्तम प्रतिसाद लक्षात घेता, नागरिकांच्या आग्रहास्तव हे शिबिर पुन्हा आयोजित करण्यात आले आहे.
हे आज दिनांक 23/11/2026 रोजी शिबिर परत डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम विद्यालय, रत्नागिरी नगर परिषद शाळा क्र. १०, मिरकरवाडा, ता. जि. रत्नागिरी येथे आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरामध्ये नागरिकांची मोफत नेत्र तपासणी करण्यात येणार असून, आवश्यक असल्यास चष्म्याची सुविधाही अत्यंत माफक दरात उपलब्ध करून देण्यात येणार आहे.चष्म्यांच्या फ्रेम मोफत उपलब्ध करून देण्यात येणार असून, नागरिकांना केवळ काचेचा खर्च करावा लागणार आहे.
शिबिरासाठी मिरज येथील तज्ज्ञ नेत्रतज्ज्ञ त्यांच्या मार्गदर्शनाखाली नागरिकांच्या डोळ्यांची तपासणी करण्यात येणार आहे.
यापूर्वी कालच आयोजित करण्यात आलेल्या शिबिराला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहत चांगला प्रतिसाद दिला. अनेक नागरिकांनी शिबिर पुन्हा घेण्याची मागणी केली होती. नागरिकांच्या या मागणीची दखल घेत नगरसेविका आफरीन उबैद होडेकर यांनी पुन्हा शिबिराचे आयोजन केले आहे.
विशेष म्हणजे, मागील शिबिरादरम्यान नगरसेविका आफरीन उबैद होडेकर यांनी सकाळी १० वाजल्यापासून सायंकाळी ५ वाजेपर्यंत स्वतः उपस्थित राहून नागरिकांची विचारपूस केली तसेच नेत्र तपासणीची प्रक्रिया व्यवस्थित पार पडते आहे की नाही, याकडे लक्ष दिले. त्यांच्या या प्रत्यक्ष सहभागाचे नागरिकांकडून कौतुक करण्यात आले.
आपल्या प्रभागातील नागरिकांच्या विविध समस्या सोडविण्यासोबतच त्यांच्या आरोग्याचीही काळजी घेण्याचा प्रयत्न नगरसेविका आफरीन उबैद होडेकर सातत्याने करत असल्याचे या उपक्रमातून दिसून येत आहे. नागरिकांशी थेट संवाद साधत त्यांच्या गरजा समजून घेऊन त्यानुसार उपक्रम राबविण्याच्या त्यांच्या कार्यपद्धतीचे नागरिकांकडून कौतुक होत आहे.
मिरकरवाडा परिसरातील नागरिकांनी या मोफत नेत्र तपासणी शिबिराचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन नगरसेविका आफरीन उबैद होडेकर यांनी केले आहे.
नागरिकांच्या आग्रहास्तव मिरकरवाडामध्ये पुन्हा नेत्र तपासणी शिबिर
Leave a Comment
