नगरसेविका आफरीन उबैद होडेकर यांच्या पुढाकाराने मोफत नेत्र तपासणी शिबिर

Shabbir Vasta
1 Min Read

रत्नागिरी : नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेत त्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी सातत्याने पुढाकार घेणाऱ्या नगरसेविका आफरीन उबैद होडेकर यांच्या पुढाकाराने रविवार, दि. २२ नोव्हेंबर २०२६ रोजी मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. त्यांच्या प्रभागातील नागरिकांना आरोग्याच्या सुविधा सहज उपलब्ध व्हाव्यात, या उद्देशाने हे शिबिर आयोजित करण्यात आले आहे.

या शिबिरासाठी मिरज येथील तज्ज्ञ नेत्रतज्ज्ञ येणार असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली नागरिकांच्या डोळ्यांची तपासणी करण्यात येणार आहे. या शिबिरामध्ये तज्ज्ञ नेत्रतज्ज्ञांकडून नागरिकांच्या डोळ्यांची तपासणी करण्यात येणार असून, मोतीबिंदू ऑपरेशन तसेच इतर डोळ्यांच्या उपचारांवर सवलत उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच चष्म्यांच्या फ्रेम मोफत देण्यात येणार असून, नागरिकांना केवळ काचेचा खर्च करावा लागणार आहे.

शिबिराचे आयोजन डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम विद्यालय, रत्नागिरी नगर परिषद शाळा क्र. १०, मिरकरवाडा, ता. जि. रत्नागिरी येथे सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत करण्यात आले आहे.

नगरसेविका आफरीन उबैद होडेकर या आपल्या प्रभागातील नागरिकांच्या सुख-दुःखात सहभागी होत विविध सामाजिक व नागरिकोपयोगी उपक्रम राबविण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील असतात. नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित उपक्रमांना प्राधान्य देत त्यांनी आयोजित केलेले हे नेत्र तपासणी शिबिर त्यांच्या सामाजिक बांधिलकीचे आणि जनसेवेच्या भूमिकेचे आणखी एक उदाहरण ठरत आहे.

या शिबिराचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन नगरसेविका आफरीन उबैद होडेकर यांनी केले आहे.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *