रत्नागिरी : अँन्टि करप्शन बोर्ड (रजि.), उपभोक्ता एवं मानव अधिकार रक्षा समिती (रजि.) आणि ऑनररी डॉक्टरेट अवॉर्ड फाउंडेशन (रजि.) यांच्या संयुक्त विद्यमाने मुंबईतील दादर येथे आयोजित करण्यात आलेल्या ४थ्या महाराष्ट्र राज्य सेमिनार, २ऱ्या महाराष्ट्र राज्य अधिवेशन व पुरस्कार वितरण सोहळ्यात श्री. गजानन जाधव यांना ‘बेस्ट परफॉर्मन्स अवॉर्ड-२०२६’ देऊन गौरविण्यात आले.
मुंबई, दादर येथे झालेल्या या भव्य सोहळ्यास राज्यभरातून आलेले विविध पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते तसेच मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. भ्रष्टाचाराविरुद्ध लढा, ग्राहक व सामान्य नागरिकांच्या हक्कांचे संरक्षण तसेच सामाजिक न्यायाच्या क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत श्री. जाधव यांना हा सन्मान प्रदान करण्यात आला.
मान्यवरांच्या हस्ते श्री. जाधव यांना प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या सामाजिक कार्याचे कौतुक करून पुढील सामाजिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
या प्रतिष्ठेच्या पुरस्कारामुळे कोल्हापूर जिल्ह्यासह श्री. जाधव यांच्या मित्रपरिवार, सहकारी व कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून त्यांच्या कार्याचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.


