सिकंदर युसुफ फरास यांना ‘राज्यस्तरीय आदर्श पत्रकार पुरस्कार’

Shabbir Vasta
1 Min Read

चिपळूण : सर्वसामान्यांच्या समस्या आणि जनतेच्या प्रश्नांना आपल्या लेखणीच्या माध्यमातून प्रभावीपणे वाचा फोडत त्यांचा शासन दरबारी सातत्याने पाठपुरावा करणारे पत्रकार सिकंदर युसुफ फरास यांना ‘राज्यस्तरीय आदर्श पत्रकार पुरस्कार’ प्रदान करून सन्मानित करण्यात आले.
     वर्ड फॉर नेचर इंडिया, रत्नागिरी शाखेच्या सहाव्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या दुसऱ्या राज्यस्तरीय पुरस्कार सोहळ्यात हा गौरव करण्यात आला. चिपळूण येथील वनविभाग कार्यालयातील कै. निलेश बापट कलादालनात रविवारी हा पुरस्कार सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
     संस्थेचे अध्यक्ष शुभम पांडे यांच्या हस्ते पत्रकार सिकंदर युसुफ फरास यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. आपल्या पत्रकारितेच्या माध्यमातून त्यांनी समाजातील विविध घटकांच्या समस्या, नागरिकांच्या अडचणी तसेच जनहिताचे प्रश्न सातत्याने मांडले आहेत. केवळ प्रश्न मांडण्यापुरते मर्यादित न राहता संबंधित प्रश्नांचा शासन व प्रशासन स्तरावर सातत्याने पाठपुरावा करून ते मार्गी लावण्यासाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांची दखल घेत संस्थेने त्यांचा या पुरस्काराने गौरव केला.
     जनतेच्या प्रश्नांना प्राधान्य देत सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या त्यांच्या पत्रकारितेचा हा सन्मान असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
     या पुरस्कार सोहळ्यास विविध क्षेत्रांतील मान्यवर, वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी, पत्रकार, निसर्गप्रेमी तसेच संस्थेचे पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. पुरस्कार मिळाल्याबद्दल सिकंदर युसुफ फरास यांचे विविध स्तरातून अभिनंदन होत आहे.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *