पुणे:
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने १२ वीचा निकाल जाहीर केला असून, यंदा निकालासोबतच गुणपत्रिकेच्या (Marksheet) स्वरूपात ऐतिहासिक बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. पारदर्शकता वाढवण्यासाठी आणि विद्यार्थ्यांचा गोंधळ टाळण्यासाठी बोर्डाने हे पाऊल उचलले आहे.
मार्कशीटमधील ३ सर्वात मोठे बदल:
१. नावाचा क्रम बदलला: यापूर्वी मार्कशीटवर आधी आडनाव असायचे. मात्र, आता आधार कार्ड किंवा ‘अपार’ (APAAR) आयडीवरील नोंदीनुसार, आधी विद्यार्थ्याचे नाव, त्यानंतर वडिलांचे नाव आणि शेवटी आडनाव अशा क्रमाने नाव छापले जाणार आहे.
२. फोटो आणि QR कोड: सुरक्षेच्या दृष्टीने प्रत्येक विद्यार्थ्याचा फोटो आता गुणपत्रिकेवर असेल. तसेच, एक विशिष्ट QR कोड दिला जाईल, ज्यामुळे निकालाची डिजिटल पडताळणी करणे सोपे होईल.
३. प्रमाणपत्र आणि गुणपत्रिका एकत्र: आधी निकालांनंतर सर्टिफिकेटसाठी ६ महिने वाट पाहावी लागायची. आता निकाल लागल्यापासून १५ दिवसांत गुणपत्रिका आणि बोर्डाचे मूळ प्रमाणपत्र (Certificate) दोन्ही एकाच वेळी दिली जाणार आहेत.
निकालावर एक नजर:
राज्याचा निकाल: ८९.७९%
कोकण विभाग पुन्हा अव्वल: ९४.१४% निकालासह कोकणाने आपले वर्चस्व कायम राखले आहे.
मुलींची बाजी: मुलींचे उत्तीर्णतेचे प्रमाण ९३.१५% असून मुलांच्या तुलनेत त्या ६.३५% नी आघाडीवर आहेत.
सर्वात कमी निकाल: लातूर विभाग (८४.१४%).
प्रशासकीय खर्चात मोठी बचत
या नवीन बदलांमुळे आणि डिजिटल प्रक्रियेमुळे बोर्डाच्या प्रशासकीय खर्चात तब्बल ३ कोटी रुपयांची बचत होणार असल्याची माहिती बोर्डाच्या अध्यक्षांनी दिली आहे.
मार्कशीटवर आता पहिले नाव! महाराष्ट्र बोर्डाचे ३ मोठे बदल; जाणून घ्या कधी मिळणार सर्टिफिकेट
Leave a Comment
