राजापूर (प्रतिनिधी) : “माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव” या उपक्रमांतर्गत ग्रामपंचायत रायपाटणच्या वतीने गुरुवार, दि. ४ जून २०२६ रोजी सकाळी १० वाजता ग्रामपंचायत कार्यालयात मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
या आरोग्य शिबिरात नागरिकांसाठी विविध आरोग्यविषयक सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. आभा (ABHA) कार्ड, वय वंदना कार्ड तसेच पीएम-जय (PMJAY) अर्थात आयुष्मान भारत योजनेअंतर्गत कार्ड नोंदणीची सुविधा उपलब्ध राहणार आहे.याशिवाय कान-नाक-घसा तपासणी, हिमोग्लोबिन (Hb) तपासणी, मधुमेह तपासणी, आवश्यक औषधोपचार तसेच तज्ज्ञांकडून आरोग्यविषयक मार्गदर्शन करण्यात येणार आहे. ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
ग्रामपंचायत प्रशासनाने सर्व ग्रामस्थांनी या मोफत आरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा तसेच आपल्या कुटुंबीयांनाही सहभागी करून घ्यावे, असे आवाहन केले आहे.
रायपाटण ग्रामपंचायतीत आज मोफत आरोग्य शिबिर
Leave a Comment
