कोकणची कन्या आयशा इब्राहिम काझी यांची भरारी!
रत्नागिरी/दापोली: कोकणच्या मातीतील सुपुत्री आणि आपल्या कर्तृत्वाने संपूर्ण कोकण समाजाचा मान उंचावणारी आयशा इब्राहिम काझी, सध्या यशाच्या शिखरावर आहे. वर्ष २०२३ मध्ये कठीण अशा ‘आयसीएस-यूपीएससी’ (ICS-UPSC) परीक्षेत यश मिळवून तिने संपूर्ण समाजाचा अभिमान वाढवला आहे.
मूळची रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील अंजारले (जुईकर मोहल्ला) येथील रहिवासी असलेली आयशा, सध्या काल्वा-मुंब्रा (ठाणे) येथे वास्तव्यास आहे. अत्यंत हुशार आणि प्रतिभावान असलेल्या आयशाने ‘इंडियन रेव्हेन्यु सर्व्हिस’ (IRS) मध्ये अधिकारी प्रशिक्षणार्थी (Officer Trainee) म्हणून जबाबदारी स्वीकारली आहे.
नुकत्याच झालेल्या एका विशेष प्रसंगी, आयशा इब्राहिम काझी यांनी भारताच्या माननीय राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची राष्ट्रपती भवन येथे भेट घेतली. राष्ट्रपतींची भेट घेणाऱ्या प्रतिष्ठित प्रतिनिधीमंडळाचा त्या एक भाग होत्या. कोकणच्या या कन्येच्या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत असून, ती नवीन पिढीसाठी प्रेरणास्थान ठरली आहे.
