रत्नागिरी:
जिल्हा परिषद शिक्षक संवर्गातील पदोन्नती प्रक्रियेत निर्माण झालेला कायदेशीर आणि प्रशासकीय संभ्रम लक्षात घेता, महाराष्ट्र विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा दादू बनसोडे यांनी ही प्रक्रिया तूर्तास स्थगित करण्याचे आदेश दिले आहेत.
पदोन्नती प्रक्रियेबाबत निर्माण झालेला कायदेशीर व प्रशासकीय संभ्रम दूर करण्यासाठी शिक्षण विभाग आणि सामान्य प्रशासन विभागाकडून सुस्पष्ट अहवाल प्राप्त होईपर्यंत ही कार्यवाही थांबवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
या संदर्भात राज्यातील सर्व जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना (सीईओ) लेखी पत्र पाठवण्यात आले असून, पुढील आदेश येईपर्यंत कोणत्याही प्रकारची अंमलबजावणी न करण्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
पदोन्नती प्रक्रियेमध्ये जिल्हा पदोन्नती समितीच्या बैठकीच्या तारखेपर्यंत आवश्यक पात्रता पूर्ण करणाऱ्या सेवाज्येष्ठ शिक्षकांचा पदोन्नतीसाठी समावेश करावा, अशी मागणी राज्यातील अनेक शिक्षक संघटनांकडून सातत्याने केली जात आहे.
शिक्षक पदोन्नती प्रक्रियेला तूर्तास ‘ब्रेक’
Leave a Comment
