मुंबई:
राज्यातील औद्योगिक विकासाला अधिक गती देण्यासाठी आणि नवीन गुंतवणुकीला आकर्षित करण्यासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (म.औ.वि.म.) संचालक मंडळाची एक अत्यंत महत्त्वपूर्ण बैठक राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री ना. उदयजी सामंत यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच पार पडली.
या बैठकीत राज्यातील उद्योग क्षेत्राला बळकटी देणारे अनेक महत्त्वाचे निर्णय आणि योजनांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
गुंतवणुकीसाठी पोषक वातावरण: राज्यातील औद्योगिक प्रकल्पांचा वेग वाढवणे आणि नवीन उद्योजकांना आकर्षित करण्यासाठी अनुकूल वातावरण तयार करण्यावर विशेष भर दिला जाईल.औद्योगिक क्षेत्रांमधील रस्ते, पाणी, वीज आणि इतर पायाभूत सुविधांचा मोठ्या प्रमाणावर विस्तार केला जाणार आहे.विविध कारणांमुळे प्रलंबित असलेल्या उद्योजकांच्या अडीअडचणी त्वरित सोडवण्याचे निर्देश मंत्र्यांनी दिले.
तरुण पिढीसाठी रोजगाराच्या जास्तीत जास्त नवीन संधी कशा उपलब्ध करून देता येतील, यावर अधिक गतीने कार्य करण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या.
राज्याचा औद्योगिक विकास अधिक गतिमान करणे आणि स्थानिक पातळीवर मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध करून देणे हे आपले मुख्य उद्दिष्ट आहे. उद्योजकांच्या अडचणी सोडवून पायाभूत सुविधांचा दर्जा सुधारण्याला प्राधान्य दिले जाईल.आसे ही ना. उदय सामंत म्हणाले.
उद्योगांना गती अन् तरुणांना रोजगार; मंत्री उदय सामंत यांचे अधिकाऱ्यांना महत्त्वपूर्ण आदेश
Leave a Comment
