३७ वर्षांच्या ज्ञानदानानंतर आदर्श शिक्षिका समीरा कारविणकर सेवानिवृत्त; चिपळूणात सेवापूर्ती सोहळा ‘दणक्यात’ संपन्न!

Shabbir Vasta
2 Min Read

चिपळूण:
आपली अखंड ३७ वर्षे विद्यार्थ्यांच्या जडणघडणीसाठी आणि शैक्षणिक-सामाजिक विकासासाठी झोकून देणाऱ्या चिपळूण येथील अत्यंत कार्यकुशल, सेवाभावी व उपक्रमशील आदर्श शिक्षिका समीरा शौकत कारविणकर यांचा सेवापूर्ती सोहळा अत्यंत उत्साहात आणि दणक्यात साजरा करण्यात आला. या सोहळ्याला आजी-माजी विद्यार्थी, पालक, शिक्षण क्षेत्रातील मान्यवर आणि विविध क्षेत्रांतील पदाधिकारी यांनी अलोट गर्दी केली होती.
     समीरा कारविणकर यांनी आपली संपूर्ण सेवा चिपळूण तालुक्यात अत्यंत निष्ठेने बजावली. प्रेमळ स्वभाव आणि अचूक मार्गदर्शनामुळे त्यांनी विद्यार्थ्यांच्या मनावर उत्तम संस्कार रुजवले. आज त्यांचे असंख्य विद्यार्थी देश-विदेशात वेगवेगळ्या उच्च पदांवर कार्यरत असून त्यांच्या यशात कारविणकर मॅडम यांच्या मार्गदर्शनाचा मोठा वाटा असल्याचे बोलले जाते. त्यांच्या याच कार्याचा गौरव करण्यासाठी आयोजित सोहळ्यात उपस्थित सर्वांनीच त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला.
     या सोहळ्याला चिपळूणच्या नगरसेविका नसरीन खडस, ज्येष्ठ शिक्षिका सफिया मोगल मॅडम, रत्नागिरी जिल्ह्यातील प्रसिद्ध समाजसेवक एजाज इब्जी, रिझवाना इब्जी, अन्वर कुरवले, रेहाना वलेले, शरफत वलेले, सलीम गडकरी, बशीर अलवारे, मुश्ताक अष्टीकर, इक्बाल दळवी, निलम दळवी, नुरजहाॅं खलफे, राहीन नेवरेकर, नाईला खडस यांच्यासह शिक्षण क्षेत्रातील अनेक शिक्षक, शिक्षिका, विविध संस्थांचे अधिकारी, पदाधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
     उपस्थित मान्यवरांनी समीरा कारविणकर यांच्या कर्तृत्वाचा गौरव करत त्यांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. याप्रसंगी शौकत कारविणकर आणि समीरा कारविणकर यांचा यथोचित सन्मान करून, त्यांना पुढील सुखी आणि निरोगी भावी आयुष्यासाठी मन:पूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *