रत्नागिरीत जकी खान यांच्या वाढदिवसानिमित्त ‘महा रक्तदान शिबिराचे’ आयोजन!

Shabbir Vasta
1 Min Read

रत्नागिरी (प्रतिनिधी):
रत्नागिरीतील प्रसिद्ध सामाजिक संस्था ‘मसीहा फाउंडेशन’ पुरस्कृत आणि ‘शिवखोल फ्रेंड्स सर्कल’ यांच्या संयुक्त विद्यमाने एक स्तुत्य सामाजिक उपक्रम हाती घेण्यात आला आहे. सामाजिक कार्यकर्ते जकी खान यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून रत्नागिरीत एका भव्य ‘महारक्तदान शिबिराचे’.आयोजन करण्यात आले आहे.
“रक्तदान हेच जीवनदान, ते वाचवते दुसऱ्याचे प्राण…!”  हा उदात्त संदेश डोळ्यासमोर ठेवून या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर रक्ताचा तुटवडा भासू नये आणि गरजू रुग्णांना वेळेत रक्त मिळावे, या उद्देशाने जकी खान यांच्या वाढदिवसाचे कोणतेही थाटमाट न करता अशा सामाजिक उपक्रमाद्वारे वाढदिवस साजरा करण्याचा निर्णय आयोजकांनी घेतला आहे.
शिबिराचा सविस्तर तपशील खालीलप्रमाणे:
दिनांक: रविवार, ७ जून २०२६
वेळ: सकाळी ९:०० ते दुपारी ३:०० वाजेपर्यंत
स्थळ: ब्लड बँक, जिल्हा रुग्णालय, रत्नागिरी
      मसीहा फाउंडेशन आणि शिवखोल फ्रेंड्स सर्कलच्या वतीने रत्नागिरीतील जास्तीत जास्त रक्तदात्यांनी, विशेषतः तरुणांनी या महा रक्तदान शिबिरात उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन रक्तदान करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. आपल्या रक्ताचा एक थेंब कोणाचा तरी जीव वाचवू शकतो, त्यामुळे या सामाजिक कार्यात आपले योगदान नक्की द्या. या शिबिराबाबत अधिक माहितीसाठी किंवा नाव नोंदणीसाठी ७६७८०८१८७५ या क्रमांकावर संपर्क साधू शकता.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *