आमदार म्हणजे केवळ अधिकार नाही, तर जनतेचा विश्वास!
राजापूर-लांजा-साखरपा मतदारसंघाचे आमदार किरण (भय्या) सामंत यांचा एक अत्यंत भावूक आणि खास फोटो सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये एक वृद्ध माऊली अत्यंत प्रेमाने आणि आपुलकीने आमदार किरण भय्या सामंत यांच्याशी संवाद साधताना आणि त्यांना आशीर्वाद देताना दिसत आहे.एका वृद्ध माऊलीने दाखवलेले हे मातृप्रेम आणि भय्यांच्या चेहऱ्यावरील तो आदरयुक्त भाव… हेच दाखवते की जनता त्यांच्यावर स्वतःच्या मुलाप्रमाणे प्रेम करते.
“हा फोटो लोकप्रतिनिधी म्हणजे काय ते दाखवून देतो. स्वतःच्या मुलाप्रमाणे जनता प्रेम करते… कामातून बोलणारे नेते आमदार किरण भय्या सामंत,” अशा कॅप्शनसह हा फोटो कार्यकर्त्यांकडून आणि नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे.
नेहमीच सर्वसामान्य जनतेच्या सुख-दुःखात धावून जाणारे आणि आपल्या विकासकामांच्या जोरावर लोकांच्या मनात घर केलेले नेते म्हणून किरण भय्या सामंत यांच्याकडे पाहिले जाते. या फोटोवरून पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे की, जनतेचे त्यांच्यावर किती निरतिशय प्रेम आहे.
